कालाग्रमाच्या केंद्रभागी अर्ध वर्तुळाकार अँम्फीथिएटर ३० फूट लांब आणि २० फूट रुंद जागेत विकसित करण्यात आले आहे. दृश्यकला सादारीकरणासाठी उभारण्यात आलेला हा खुला रंगमंच एरीना थिएटरच्या स्वरूपाचा असून ४५० प्रेक्षक येथे एका वेळी बसू शकतात. डी. वाय. पाटील महाविद्यालय, सत्याग्रह महाविद्यालय, हार्मनी स्कूल, रोटरी क्लब यांनी आपली वार्षिक स्नेह संमेलने येथे साजरी केली आहेत. सकाळी ९.०० ते रात्रौ १०.०० या वेळेत हा रंगमंच नृत्य, नाट्य आदि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी भाडेतत्वावत उपलब्ध होऊ शकतो.

सुरक्षा अनामत ५,००० रुपयांसह १३,८०० रुपये एका दिवसाचे भाडे असून त्यातील सुरक्षा अनामत रक्कम परत केली जाते.

सांस्कृतिक कार्यक्रम

पंडित हरीप्रसाद चौरासिया, पंडित जसराज, शुभ मुदगल, जगजीत सिंग यांच्यासारख्या भारतीय शास्त्रीय आणि सुगम संगीतातील दिग्गाजांचेही कार्यक्रम येथे पार पडले आहेत. हिंदी, बंगाली, केरळी तसेच मराठी चित्रपट व नाट्य सृष्टीतील जॅकी श्रॉफ, जॉनी लिव्हर यासारख्या कलाकारांनी देखील येथे हजेरी लावली आहे.