फुलपाखरू उद्यान

सुमारे ५०० रंगीबेरंगी झाडं-झुडपं यांची लागवड करून सिडकोने कलाग्राम मध्ये तीन फुलपाखरू उद्याने विकसित केली आहेत. सप्टेंबर ते फेब्रुवारी या काळात ही झाडं-झुडपं बहरतात आणि फुलापाखरांना आकर्षित करतात. चॉकलेट पॅन्सी, लेमन पॅन्सी, मॉर्मन अशा सुमारे २८ प्रजातींचा वावर येथे आढळला आहे. हे उडणारे रंग न्याहाळण्याचा सर्वोत्तम कालावधी म्हणजे पावसाळ्यानंतरचे तीन महिने.

फुलपाखरू उद्यान