नया रायपूर

 

भारताचे २६ वे राज्य म्हणून छत्तीसगढची १ नोव्हेंबर २००० मध्ये स्थापना झाली. राज्य शासनाने राजधानी शहर नया रायपुरसाठी विकास प्राधिकरणाची स्थापना केली. प्राधिकरणाने राजधानी वसवण्याकरता सल्लागार तज्ज्ञ म्हणून सिडकोची नेमणूक केली. सुमारे ८० चौ. कि. मि. क्षेत्रावर साडेपाच लाख लोकवस्तीसाठी या शहराचे नियोजन करण्याची जबाबदारी सिडकोवर सोपवण्यात आली ज्यात मंत्रालय तसेच विभागीय मुख्यालये यांचाही समावेश होता.