चिखलदरा थंड हवेचे ठिकाण
विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा गिरीस्थान परिसरातील 1936 हे. अधिसूचित क्षेत्राचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे सिडकोची ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणून नियुक्ती करण्यात आली. सदर प्रकल्पाच्या सिडकोतर्फे तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यास महाराष्ट्र शासनातर्फे मुंजरी देण्यात आली आहे. सदर विकास आराखड्यामध्ये स्काय वॉक उभारणे, गोल मार्ग (अंशत:) विकसित करणे, रोप वे, मिनी ट्रेन, बोटिंग इ. सोयीसुविधांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे.
हरिकेन पॉईंट व गोराघाट पॉईंट या ठिकाणांना जोडणारा 470 मीटर लांबीचा स्काय वॉक हा जगातील पहिला सिंगल केबल सस्पेन्डेड स्कायवॉक पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. प्रस्तावित गोल मार्ग हा चिखलदरा शहराच्या 27 किमीच्या परिघातील मार्ग आहे. जिल्हा परिषदेकडून हस्तांतरित करण्यात आल्यानंतर सिडकोतर्फे सदर मार्ग विकसित करण्यात येईल.