Accessibility Options

Screen reader Access

A-|A|A+

<बांधकाम परवानगी

बांधकाम परवानगी

सिडको-नैना हे नैना क्षेत्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण (SPA) आहे आणि कोणत्याही विकासासाठी, नैना कार्यालयाकडून विकासाची परवानगी दिली जाते. बांधकाम परवानगीसाठी प्राप्त प्रस्तावांची छाननी नैना क्षेत्रातील मंजूर विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (DCPR) नुसार नैनाच्या बांधकाम परवानगी विभागाद्वारे केली जाते.

शासनाच्या दि.२४.०८.२०१८ रोजीच्या निर्देशाचा एक भाग म्हणून आणि महाराष्ट्र लोकसेवा कायदा २०१५ च्या अंतर्गत सदर सेवेचा समावेश करण्यासाठी आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यवसाय सहजतेने करणे करिता पुढकार घेवून सुधारणेचा एक भाग म्हणून बांधकाम परवानगी अधिक सुलभ, जलद व पारदर्शक करणेसाठी नैना एकत्रित मान्यता व्यवस्थापन प्रणाली (NIAMS) नावाची स्वयंचलित (automated) बांधकाम परवानगी प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे.

नैना एकत्रित मान्यता व्यवस्थापन प्रणाली (NIAMS) द्वारे प्रस्तावांची छाननी, कार्यपद्धती जलद करणे शक्य होते आणि बांधकाम परवानगी प्रस्तावांची त्वरित विल्हेवाट लावणे शक्य होते. बांधकाम परवानगीच्या विविध टप्प्यावरील कार्यपद्धतीवर प्रभावी देखरेख ठेवणे शक्य होते. सर्च विंडोवर नागरिक आवश्यक माहिती मिळवू शकतात. या प्रणालीमुळे नागरिकांना भरणा करणेसाठी सुलभ पर्याय खुले होतात आणि प्रक्रिया अधिक पारदर्शक व कार्यक्षम होते.

विकासाशी संबंधित परवानग्यांमध्ये Commencement Certificate (CC), Plinth Completion Certificate (PCC), Amended Commencement Certificate (ACC), Occupancy Certificate (OC), लेआउट परवानगी, वाढ/बदल करण्याची परवानगी, तात्पुरती परवानगी, मोबाइल टॉवर बसविण्याची परवानगी, होर्डिंग बसविण्याची परवानगी, अनधिकृत रचना/प्रशमित संरचना (Compounded Structures) नियमित करणे इत्यादी.