महाराष्ट्र शासनाने दिनांक १०.०१.२०१३ च्या अधिसूचने अंतर्गत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम ४० (१) अन्वये रायगड जिल्ह्यातील २५६ गावे व ठाणे जिल्ह्यातील १४ गावे समाविष्ट असलेल्या सुमारे ५६० चौ.कि.मी. क्षेत्रासाठी सिडकोला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त केले. नैना क्षेत्रात ठाणे जिल्ह्यातील व रायगड जिल्ह्यातील ठाणे, उरण, कर्जत, पेण, खालापूर आणि पनवेल अश्या सहा तालुक्यांमधील एकूण २७० गावे आहेत. त्यातील काही गावे अंशतः माथेरान इको सेन्सिटिव्ह झोन (MESZ) मध्ये येतात.
महाराष्ट्र शासनाच्या दि. १४ जुलै २०१५ च्या शुद्धीपात्रकाद्वारे नैना क्षेत्रातून रोडे गाव वगळण्यात आले आणि नेवाळी गाव सामाविष्ट करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या क्रमांक आयडीसी २००७/(७१८)/आयएनडी- १४ दि. २२ सप्टेंबर २०१५, रोजीच्या अधिसूचने अन्वये खालापूर तालुक्यातील आठ गावांसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास (MIDC) विशेष नियोजन प्राधिकरण (SPA) म्हणून नियुक्त केले. या अधिसूचनेनुसार, तीन गावे (वांगणी, केळवली आणि कांढरोली तर्फे बोरोटी) पूर्णपणे एमआयडीसीच्या अखत्यारीत आहेत तर पाच गावे अंशतः एमआयडीसी व नैना क्षेत्रामध्ये येतात.
महाराष्ट्र शासनाने क्र. टीपीएस -१८१५/ यूओआर/७८/१५/ यूडी -१३ दि. १७ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या अधिसूचनेद्वारे ८४ गावांसाठी (खालापूर तहसीलमधील ६७ गावं आणि पनवेल तहसीलमधील १ गावं) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास विशेष नियोजन प्राधिकरण (SPA) म्हणून नियुक्त केले.
महाराष्ट्र शासनाने दि. २७.०४.२०१७ रोजीच्या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम ३१ अन्वये नैना क्षेत्रातील २३ गावांसाठीचा अंतरिम विकास आराखड्याचा मसुदा मंजूर केला.
अंतरिम विकास आराखड्यास शासनाची स्पष्टपणे मंजुरी मिळवण्याचा पहिला टप्पा राज्यात प्रथमच या शहराने गाठला आहे. तेव्हापासूनच नगर रचना परियोजनेच्या यंत्रणेद्वारे पायाभूत सुविधांच्या वेगवान अंमलबजावणीसाठी नैना पाठपुरावा करत आहे.
राज्य शासनाने दि.१६.०९.२०१९ रोजी नैनाचा विकास आराखडा मंजूर करताना, प्रकल्पाच्या एकसंधपणाचा विचार करून, नैनाच्या मुख्य क्षेत्राशी असंलग्न असलेली, खालापूर आणि कर्जत तालुक्यातील ३५ गावे व ठाणे तालुक्यातील 14 गावे वगळली, त्यामुळे नैनाच्या कार्यक्षेत्रात फक्त रायगड जिल्ह्यातील १७५ गावे राहिली असून त्यांचे क्षेत्र 372 चौरस किमी आहे.