मुख्यपृष्ठ विभाग
परिवहन आणि दूरसंचार विभागाची भूमिका वाहतूक आणि परिवहनाच्या पायाभूत सुविधा तसेच नैनासाठी दळणवळण प्रणालीचे नियोजन, रचना आणि अंमलबजावणी करणे आहे. नैनाची परिवहन व्यवस्था नवी मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश (MMR) च्या एकंदर परिवहन प्रणालीस अंतर्भूत करून तयार करण्यात आलेली आहे. नैनाच्या विकास आराखड्यामध्ये रस्त्याचे नियोजन आणि एकात्मिक परिवहन व्यवस्थेचा समावेश आहे ज्यामध्ये श्रेणीबद्ध रस्त्याचे जाळे, स्पाईन रोड, मल्टी मॉडेल कॉरिडोर, मुंबई वडोदरा स्पर, उपशहरी रेल्वे मार्गाचे जाळे आणि मेट्रो मोठ्या प्रमाणात इतर प्रदेशांना जोडतात.
रस्त्याच्या नियोजनाचा स्तर नैनाच्या विकास आराखड्यातील पायाभूत सुविधांची अंमलबजावणी नगररचना योजने अंतर्गत करत असताना उंचाविण्यात आला आहे शहर- स्तरीय उच्च क्षमता मल्टि मोडल कॉरिडोर, मुंबई वडोदरा स्पर, शहरी द्रुतगती मार्गाचे नियोजन नियंत्रित प्रवेश ठेवून करण्यात आले आहे जेणेकरून सभोवतालीच्या शहरातील व शहराबाहेरील वाहतूकीस अडचण होवू नये.