मुख्यपृष्ठ विभाग
अभियांत्रिकी विभागाची भूमिका प्रामुख्याने रस्ते, पाणीपुरवठा, मलनिःसारण व्यवस्था, पावसाच्या पाण्याचे गटारी आणि वीजपुरवठा यासारख्या मूलभूत सुविधांची आखणी व अंमलबजावणी आहे. त्याचबरोबर शहर रस्त्यांचे नियोजन, जलसंसाधनाचा विकास, सांडपाणी प्रक्रिया केंद, संपूर्ण अंतरिम विकास आराखडा/ विकास आराखड्यासह नगर रचना परियोजना स्तरावरील पायाभूत सुविधांचे एकत्रीकरण समाविष्ट आहे. तसेच सद्यस्थितीतील ग्रामीण पायाभूत सुविधांचे नगर रचना परियोजने अंतर्गत समन्वय साधून अश्या गावांचे शहरी गावानुसार राहणीमान उंचावणे.