Accessibility Options

Screen reader Access

A-|A|A+

झोन दाखला

झोन दाखला

झोन दाखला हा मंजूर विकास योजना / प्रादेशिक योजनेनुसार जमिनी भूवापराची पुष्टी करणारा दाखला आहे. ज्यावरून जमिनीचा संभवनीय दर ठरविण्यात येतो. झोन जमीन वापराचे स्पष्टीकरण देते आणि म्हणूनच जमिनीवर अनुन्ज्ञेय असलेले चटई क्षेत्र (FSI) ओळखण्यास मदत करते. झोन दाखला विशेषत: जमीन व्यवहारादरम्यान वापरला जातो ज्यामध्ये खरेदीदारांना आर्थिक फायदे ओळखण्यास आणि रजिस्ट्रारला मूल्यांकन काढण्यास मदत होते.

नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पनवेल (९३ गावे), पेण (७७ गावे) आणि उरण (५ गावे) तालुक्यातील १७५ गावांचा समावेश असून एकूण क्षेत्रफळ ३७१ चौ.कि.मी. आहे. नैनासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून शहर व औद्योगिक विकास महामंडळाने महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ कलम २१ च्या तरतुदी अंतर्गत दोन टप्प्यात आपली विकास आराखडा तयार केला; पहिल्या टप्प्यात – २३ गावांतील ३६८३ हेक्टरसाठी अंतरिम विकास आराखडा (IDP) आणि दुसऱ्या टप्प्यात १५२ गावातील ३३४५२ हेक्टरसाठी विकास आराखडा (DP).

महाराष्ट्र शासनाने २७ एप्रिल २०१७ रोजी नैनाचा अंतरिम विकास आराखडा (23 गावांसाठी) आणि १६ सप्टेंबर २०१९ रोजी नैनाचा विकास आराखडा (१५२ गावांसाठी) मंजूर केला.