नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (NAINA) हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील प्रस्तावित नियोजन क्षेत्र आहे, जे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMIA) जवळ आहे.
वर्ष 2008 मध्ये, महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्त्वावर उलवे, नवी मुंबई येथील ग्रीनफिल्ड विमानतळाच्या विकासास मान्यता दिली व अंमलबजावणीसाठी नोडल एजन्सी म्हणून सिडकोस नियुक्त केले. प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सिडकोने विविध प्राधिकरणाकडून सर्व मंजुरी यशस्वीरित्या प्राप्त केल्या. भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने (MoEFCC) पर्यावरण आणि तटीय नियामक क्षेत्राला (CRZ) मंजुरी देताना प्रस्तावित ग्रीनफील्ड विमानतळाच्या 20 कि.मी. परिघातील अनियोजित आणि अनियंत्रित विकासाबद्दल चिंता व्यक्त केली
या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या २० कि.मी. परिघातील क्षेत्रास “नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (NAINA)” म्हणून अधिसूचित केले. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम ४०(१)(ब) अन्वये टिपीस -१७१२/ ४७५/ प्र. क्र.-९८/ १२/ न वि -१२ दि. १० जानेवारी २०१३ रोजी शासकीय अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या असाधारण राजपत्रात प्रकाशित करून महाराष्ट्र शहर व औद्योगिक विकास महामंडळास (CIDCO) या अधिसूचित भागाच्या नियोजित विकासासाठी विशेष नियोजन प्राधिकरण (SPA) म्हणून नियुक्त केले.