दळणवळण सुविधा

 

रस्ते आणि पुल

नवी मुंबईतील दळणवळण व्यवस्थेचे नियोजन करताना सुकर प्रवास हाच कळीचा मुद्दा सिडकोने अधोरेखित केला.   दळणवळण यंत्रणेत रस्त्यांच्या अधिश्रेणीनुसार नागरी द्रुतगतीमार्ग, जोडरस्ते, मुख्य रस्ते, जोडरस्ते आणि स्थानिक रस्ते अशी रचना करण्यात आली. शहराच्या सर्वसमावेशक दळणवळण यंत्रणेत रेल्वे, रेल्वे, आणि हवाई वाहतुक यांचा समावेश करण्यात आला.

विनाव्यत्यय रहदारीसाठी सिडकोने नवी मुंबईत ६५०-कि.मि. लांबीचे रस्ते विकसित केले आहेत. यात ५ प्रधान पूल, ८ उड्डाण पूल, १५ मध्यम आकाराचे पूल तसेच अनेक पादचारी पुल अशी वाहतुक यंत्रणा नवी मुंबईत विकसित करण्यात आली आहे. नवी मुंबईमधील प्रमुख उड्डाणपुलांमध्ये मानखुर्द-बेलापूर रेल्वे मार्गावरील ठाणे खाडी पूल, बेलापूर-पनवेल मार्गावरील तळोजा खाडीपूल आणि जुई खाडीपूल, ठाणे-वाशी-नेरूळ मार्गावरील ठाणे खाडीपूल, नेरूळ-सीवूड्स-बेलापूर-उरण रेल्वे मार्गावरील पनवेल खाडीपूल, मोहा खाडीपूल, आणि ऐरोली खाडीपूल यांचा समावेश आहे.