सध्याच्या उपलब्ध जागा
अनु. क्र. | दिनांक | वर्णन | डाउनलोड करण्यासाठी दुवा |
---|---|---|---|
1 | 13-01-2021 | अर्ज - सिडको महामंडळातर्फे कंत्राटी पद्धत तत्त्वावर सहाय्यक परिवहन अभियंता या पदाकरिता जाहिरात ![]() | Download |
2 | 13-01-2021 | सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वे - सिडको महामंडळातर्फे कंत्राटी पद्धत तत्त्वावर सहाय्यक परिवहन अभियंता या पदाकरिता जाहिरात![]() | Download |
3 | 19-12-2019 | (कंत्राटी / प्रतिनियुक्ती) वर सुरक्षा अधिकारी पदासाठी निकाल | Download |
4 | 01-10-2019 | शुध्दीपत्रक-१) सहाय्यक परिवहन अभियंता (कायमस्वरूपी); पदे ११ २) सुरक्षा अधिकारी (कंत्राटी/प्रतिनियुक्ती); पदे: ०१ | Download |
5 | 25-09-2019 | पद भरती तपशील - १) सहाय्यक परिवहन अभियंता (कायमस्वरूपी); पदे ११ २) सुरक्षा अधिकारी (कंत्राटी/प्रतिनियुक्ती); पदे: ०१ | Download |
6 | 25-09-2019 | पुढील पदांसाठी सिडकोने मागविलेल्या अर्जांची जाहिरात: (१) सहाय्यक परिवहन अभियंता (कायमस्वरूपी); पदे ११ (२) सुरक्षा अधिकारी (कंत्राटी/प्रतिनियुक्ती); पदे: ०१ | Download |
7 | 14-12-2018 | सहाय्यक विधि अधिकारी/सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य)/ कार्यकारी अभियंता (दूरसंवाद)/ सहाय्यक अभियंता (स्थापत्य)/ आज्ञावलीकार या पदांसाठी १५/१६ डिसेंबर २०१८ रोजी होणारी भरती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील दिनांक यथावकाश कळविला जाईल. | Download |
8 | 07-12-2018 | सहाय्यक विधि अधिकारी/सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य)/ कार्यकारी अभियंता (दूरसंवाद)/ सहाय्यक अभियंता (स्थापत्य)/ आज्ञावलीकार पदभरती परीक्षा १५/१६ डिसेंबर २०१८ रोजी; प्रवेशपत्रासाठी ; परीचर् पुस्तिका. येथे क्लिक करा | Download |
9 | 24-10-2018 | सहाय्यक विधि अधिकारी,सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) कार्यकारी अभियंता (दूरसंचार),सहाय्यक अभियंता (स्थापत्य),आज्ञावलीकर (प्रॉग्रॅमर) या पदांच्या भरतीसाठी जाहिरात | Download |
10 | 02-05-2018 | आज्ञावलीकार पदाचा अंतिम निकाल | Download |
अर्ज कसा करावा ?
उमेदवाराने ऑनलाईन नोंदणी करावी आणि अधिसूचित केलेल्या प्रत्येक पदासाठी स्वतंत्ररित्या आवश्यक तपशीलासह अर्ज करावेत. पात्रतेचे निकष पूर्ण केलेल्या आणि त्यासोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडलेल्या अर्जांचाच स्वीकार केला जातो.
नियुक्ती प्रक्रिया
रिक्त जागांसाठी जाहिरात सिडको वर्तमानपत्रात प्रसिद्ध करते तसेच आपल्या वेबसाईटवर प्रस्तुत करते. ज्या पदासाठी जाहिरात करण्यात आली आहे केवळ त्या पदासाठीच केलेल्या, नियत वेळेत आलेल्या अर्जांचाच विचार करण्यात येतो. त्याखेरीज आलेल्या अन्य अर्जांचा सिडको विचार करत नाही किंवा त्यां अर्जदारांना उत्तर पाठवत नाही.
नियम आणि अटी
जाहिरात दिलेल्या पदांशी संबधित विशिष्ट सूचना तसेच सर्वसाधारण अटी व शर्ती जाहिराती/अधिसूचनांमध्ये समाविष्ट केलेल्या असतात. कोणत्याही शाखेसाठी मनुष्यबळाची गरज असेल त्यानुसार पदे अधिसूचित करून त्यासाठी जाहिरातींद्वारे आर्ज मागवले जातात. सिडकोतील कर्मचाऱ्याची सिडकोच्या महाराष्ट्रातील कोणत्याही प्रकल्पात बदली केली जाऊ शकते.
सिडकोमधील रोजगार संधी
रोजगार संधी
वैश्विक भविष्यवेध आणि उच्चत्तम ध्येय असणाऱ्या शहर आणि औदद्योगिक विकास महामंडळ अर्थात सिडकोमध्ये रोजगाराच्या आणि जीवन विकासाच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. सुमारे १७५० कर्मचारी वर्ग असलेल्या या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात नगर नियोजन आणि भौतिक सुविधा विकासाच्या क्षेत्रातले तज्ज्ञ कार्यरत आहेत.
व्यक्तिगत विकासासाठी सुयोग्य वातावरणाखेरीज महामंडळात राज्य तसेच केंद्र शासनाच्या कोणत्याही उपक्रमाशी तुलना करता सर्वोत्तम असे पगाराचे पॅकेज दिले जाते. ज्यात बेसिक व ग्रेड पे, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, शहर निवास भत्ता, प्रवासभाडे भत्ता, स्वनिर्मित भविष्य निर्वाह निधी, कर्मचारी तथा कुटुंबीय याच्यासाठी आरोग्य सुविधा, ग्रॅच्युटी आदिंचा समावेश आहे.
सिडकोमधील विविध विभागात निम्न, मध्यम तसेच वरिष्ठ स्तरावरील उपलब्ध रोजगार संधींचा लाभ उमेदवाराला घेता येईल. विविध तज्ज्ञ विभाग पुढील प्रमाणे:
नियोजन
- नियोजन
- परिवहन
- वास्तुशास्त्र
- बांधकाम परवाना
अभियांत्रिकी
- स्थापत्य
- विद्युत
- दूरसंवाद
- रेल्वे
प्रशासन
- सामान्य प्रशासन
- मनुष्यबळ विभाग
- जनसंपर्क विभाग
- पणन विभाग
- विधी विभाग
लेखा आणि वित्त
- अर्थशास्त्र विभाग
- सांख्यिकी विभाग
सुरक्षा
- अग्निशमन
- उद्द्यानशास्त्र विभाग
- शहर सेवा विभाग
- भूमी आणि भूमापन
- सार्वजनिक आरोग्य विभाग
- सामाजिक सेवा विभाग