बांधकाम साहित्य परीक्षण प्रयोगशाळा
सिडको अर्थात शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित या महाराष्ट्र राज्य शासनाच्या संपूर्ण मालकीचा हा एक सार्वजनिक उपक्रम असलेल्या कंपनी स्थापना १७ मार्च १९७० रोजी स्थापन झाली. नवी मुंबई शहराच्या विकासासाठी शासनाने नवीन नगर विकास प्राधिकरण म्हणून सिडकोची नेमणूक केली. अल्पावधीतच विशेष विकास प्राधिकरणाचा दर्जा देवून शासनाने सिडकोवर अतिरिक्क्त जबाबदारी सोपवून तिच्या कार्यकक्षा रुंदावल्या. नवी मुंबई तसेच नवीन शहराच्या विकासात सिडकोचे मोलाचे योगदान आहे. आज नगर नियोजन आणि विकासातील देशातील एक अग्रगण्य संस्था असा लौकिक सिडकोने मिळवला आहे.
पगुणवत्ता नियंत्रण आराखड्यानुसार, सिडकोने १९७४-७५ मध्ये बांधकाम अभियांत्रिकीच्या विविध वस्तुमात्रांच्या गुणवत्ता परीक्षणांसाठी स्वत:च्या भौतिक परीक्षण प्रयोगशाळेची स्थापना केली. सन २००१ मध्ये ही प्रयोगशाळा तुर्भे स्टोअर येथून सानपाडा रेल्वे स्थानक संकुलात हलविण्यात आली आणि सध्या ती तेथेच कार्यरत आहे.
अत्यंत मोक्याच्या अशा रेल्वे स्थानक संकुल, सायन-पनवेल महामार्ग आणि पाम बीच मार्ग यांच्यापासून जवळ असल्याने सर्व सम्बधीताना येथील सेवेचा लाभ सहज घेता येतो. प्रयोगशाळा सुसज्ज असून अनुभवी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली येथे काम चालते. सर्व चाचणी उपकरणे/यंत्रसामग्री यांच्यात नियमितपणे सुधारणा केली जाते. सिडकोच्या कामांसाठी आवश्यक असलेल्या विविध चाचण्या येथे केल्या जातात. या व्यतिरिक्त, शासकीय/निम-शासकीय कार्यालये आणि खाजगी संस्था/संघटना यांच्याकडूनही परीक्षण चाचणीची मागणी केली जाते.
इमारत बांधणी: सिमेंट, खडी / बारीक मिश्रण, स्टीलचे बांबू (२० मिमी व्यासापर्यंतचे), विटा/सॉलिड काँक्रीट ब्लॉक, जीआय पाईप्स, एमएम टाइल्स आणि पाणी
रस्ते बांधणी: माती, मुरुम, लहान/मोठ्या आकाराचे धातू, डांबर बिटुमेन
फील्ड घनता चाचणी.
कॉँक्रीट मिक्स डिझाइन कॉम्प्युटराइज्ड प्रोग्रामिंग, कॉँक्रीट क्यूब्स, एनडीटी/यूएसपीव्ही चाचणी आणि कंक्रीटची पारगम्यता चाचणी
चाचणी अहवाल पूर्णपणे कॉम्प्युटराइज्ड स्टेटमेंटच्या रूपात उपलब्ध होतात व ते प्रयोगशाळा प्राधिकाऱ्यानी साक्षांकित केलेले आसतात.
सिडको मटेरियल टेस्टिंग लॅब
गग्राउंड फ्लोअर, डी ००१ ते डी - ००३, सानपाडा रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स,
हायवे बाजू, नवी मुंबई ४०० ७०५
फोन नं- ०२२-२७७५२०२७
ए 2 कामाची यादी
GIA कामाची यादी
एमआयएस प्रोजेक्ट मॉनिटरिंग सिडको
जमिनीचे रिझर्व्ह भाव
जमीन किंमत आणि यंत्रणा
नवी मुंबईच्या विकासाच्या प्रक्रियेत जमीन ही महत्वाची मालमत्ता होती, नवी मुंबईतील बहुआयामी विकासाच्या गटासाठी जमीन हे एक प्रमुख स्त्रोत आहे, जमीनची किंमत संपूर्ण किमतीची पुनर्प्राप्ती सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बाब बनते. प्रत्येक नोड्ससाठी रिझर्व्ह प्राइज (आरपी) म्हणून ओळखले जाणारे ब्रेक-अगदी मूल्य दरवर्षी केले जाते.