Website Policy
नियम आणि अटी
ही वेबसाइट सायफ्युचर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी विकसित आणि संरचित केली असून तिची देखभालही तेच करीत आहेत. या नियम व अटींचा भारतीय कायद्यांच्या कक्षेत विचार केला जाईल आणि या कायद्यांद्वारेच त्याबाबत कारवाई केली जाईल. या अटी व शर्तींच्या अनुषंगाने उद्भवलेले कोणतेही विवाद भारतीय न्यायालयांच्या अधिकारक्षेत्राच्या अधीन राहतील.
या वेबसाइटवर प्रसृत केलेल्या माहितीमध्ये गैर-सरकारी/खाजगी संस्थांद्वारे तयार करण्यात आलेले हायपरटेक्स्ट दुवे किंवा संदर्भ अंतर्भूत असू शकतील. जेव्हा आपण बाहेरील वेबसाइटवर एखादा दुवा निवडता तेव्हा आपण 'भारतीय शासनाच्या संकेतस्थळांसाठी मार्गदर्शक तत्वांच्या साइटपासून विभक्त होता आणि बाहेरील वेबसाइटच्या मालक / प्रायोजकांच्या गोपनीयता आणि सुरक्षा धोरणांच्या अधीन होता.
गोपनीयता धोरण
या संकेतस्थळाद्वारे आम्ही आपण विचारलेल्या माहितीप्रीत्यर्थ आवश्यक असलेल्या माहिती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणास्तव वैयक्तिक माहिती विचारात नाही. आपण ई-मेल पत्त्यासह किंवा पोस्टल पत्त्यासह आमच्याशी संकेतस्थळाद्वारे संपर्क साधून आम्हाला वैयक्तिक माहिती सादर केली असेल तर आपण मागितलेली माहिती आपणास देण्यासाठीच केवळ ती माहिती वापरतो.
सिडकोचे संकेतस्थळ व्यावसायिक विपणनासाठी कधीही कोणाचाही वैयक्तिक माहिती तयार करत नाही किंवा एकत्रित करत नाही. स्थानिक प्रतिसादासाठी आपणास जर काही माहिती आमच्या वेबसाईटवर देणे क्रमप्राप्त असेल तर आपण कोणत्याही अन्य वैयक्तिक माहितीचा समावेश करू नये असा आपणास सल्ला देण्यात येत आहे.
हायपरलिंकिंग धोरण
आमच्या संकेतस्थळावर प्रसृत केलेली माहिती थेट आपल्यासाठी जोडण्याचा आम्ही आपणास आक्षेप घेणार नाही आणि यासाठी कोणतीही पूर्वपरवानगी आवश्यक नाही. तथापि, आमच्या संकेतस्थळाशी जोडल्या गेलेल्या कोणत्याही दुव्यांबद्द आम्हास सूचित केल्यास त्यातील बदलांची किंवा अद्ययावत माहिती संबधी आपणास आम्ही अवगत करू शकू. आम्ही आमच्या संकेतस्थळावरील पृष्ठांना फ्रेम्समध्ये लोड करण्यास परवानगी देत नाही. आमच्या संकेतस्थळाची पृष्ठे वापरकर्त्याच्या नव्याने उघडलेल्या ब्राउझर विंडोमध्ये लोड होणे आवश्यक आहे.
मुद्रणाधिकार धोरण
या संकेतस्थळावरील संहिता सिडकोच्या पूर्व परवानगीशिवाय अंशतः किंवा पूर्णतः पुनर्निर्मित केली जाऊ नये. दुसऱ्या संकेतस्थळाचा एक भाग म्हणून या संहितेचा संदर्भ दिला असेल तर योग्यरित्या ऋणनिर्देश करणे आवश्यक आहे. या संकेतस्थळावरील माहिती दिशाभूल करणाऱ्या किंवा आक्षेपार्ह संदर्भात वापरण्यात येउ नये.