कृषि उत्पन्न बाजार संकूल

कृषी उत्पन्न बाजार संकूल

दक्षिण मुंबईत होणाऱ्या कोंडीचे मुख्य कारण वेगवेगळ्या वस्तूंच्या घाऊक बाजारपेठा हेच होते. दक्षिण मुंबईतील डंकन रोड म्हणून प्रसिद्ध असलेला मौलाना अबुल कलाम आझाद रोड हा कांदा आणि बटाट्याचा पारंपरिक घाऊक बाजार होता. अत्यंत दाटीवाटीच्या या परिसरात आलेला माल उतरविण्यासाठी वा विकलेला माल चढविण्यासाठी जागा मुश्कीलीनेच होती. मालाने भरलेले ट्रक हे रस्त्याच्या कडेला ओळीने आणि आपली वेळ लवकरच येईल या आशेने तिष्ठत उभी असत. यातून एकूण रहदारीची कोंडी होत असे.

शेतमाल बाजारापासून सुरुवात करून पुढे लोखंड आणि स्टील बाजारही हलविण्याचे ठरले. कांदे आणि बटाटे घाऊक बाजारपेठेच्या बांधकामाला १९८० मध्ये सुरुवात झाली आणि ते त्याच वर्षात पूर्ण केले गेले. कांदा-बटाटा बाजाराला लागून ८.५ हेक्टरवर ट्रक टर्मिनल, शीत गोदाम गृह तसेच कृषी प्रक्रिया प्रकल्प आणि सेवा उद्द्योग साकारून वाशी हे एक जिल्हा व्यवसाय केंद्र (डीबीसी) बनविले गेले.

पाठोपाठ प्रक्रियाकृत शेतमाल, धान्य, डाळी, साखर, गूळ, मसाले, सुकामेवा, खोबरे आणि खादद्य तेलाच्या घाऊक बाजारपेठांसंबंधाने योजना बनविली गेली आणि फेब्रुवारी १९९१ पर्यंत त्यांची बांधकामेही पूर्ण केली गेली. यामध्ये दुकाने अधिक गोदामांचे ६६० गाळे आणि व्यापाऱ्यांची २७२ कार्यालये थाटली गेली. मध्यवर्ती सुविधा इमारतीत आणखी ४१२ दुकाने अधिक गोदामे आणि ३५६ व्यापारी कार्यालये सामावण्यात आली.

कडधान्य, डाळी, तांदूळ, तेलबिया आदी अन्नधान्याची घाऊक बाजारपेठेची ४२० गाळे दुकाने व गोदामांसाठी असलेली इमारत १९९३ मध्ये पूर्ण करण्यात आली. १०२९ गाळे दुकाने व गोदामांसाठी असलेली फळांच्या घाऊक बाजारपेठ फेब्रुवारी १९९६ मध्ये तर ९३६ दुकाने व गोदामांचे गाळे असलेली भाजी बाजारपेठ त्याच्याच पुढच्या महिन्यात साकारण्यात आली.

एपीएमसीच्य योजनेत कांदे आणि बटाट्याच्या घाऊक बाजारासाठी, कृषी-प्रक्रियाकृत वस्तू, धान्य, फळे आणि भाजीपाला बाजारांसाठी स्वतंत्र इमारतींची योजना बनविली गेली. बाजारपेठांचे स्थलांतर हे भविष्यात रोजगारवाढीला उपकारक ठरेल हाही उद्देश होताच, म्हणूनही त्या दिशेने प्रयत्नांनी वेग घेतला.

एक लाखाहून अधिक रोजगार निर्मिती अपेक्षित असलेल्या या एकंदर ६० अब्ज रुपयाच्या प्रकल्पाची रचना आणि नियोजन १८२ हेक्टर क्षेत्रफळावर करण्यात आले. उत्कृष्ट नागरी प्रकल्प रचनेसाठी या प्रकल्पाने पंतप्रधानांकडून पुरस्कार मिळविला. निरंतर २५ वर्षाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे सार्थक म्हणून सिडकोने सर्वोत्तम कार्यात्मक रचनेचा पुरस्कार राष्ट्रपतीच्या हस्ते स्वीकारला.

या पथदर्शी प्रकल्पाच्या ठळक वैशिष्ट्ये ही अन्यत्र घाऊक बाजारपेठा साकारण्याच्या दृष्टीने मानदंड ठरली. घाऊक बाजारपेठांच्या स्थलांतरातील हे यश नवी मुंबईच्या विकासासाठी आवश्यक चालना देणारे एक ‘सुवर्ण पर्व’ निश्चितच म्हटले पाहिजे. त्यातून नवी मुंबईचे रोजगाराची निर्मिती करणारे केंद्र, एक स्वयंपूर्ण शहर म्हणून स्थान निर्माण केले. कर्णाक बंदर तसेच भांडूप विदद्याविहारमधील पोलाद उत्पादकांचे स्टॉक यार्ड १९७९ साली कळंबोळीला २७५ हेक्टरचे क्षेत्रफळावर हलविण्यात आले. 

आंतरराष्ट्रीय इन्फोटेक पार्क

आंतरराष्ट्रीय इन्फोटेक पार्क

नवी मुंबईचे औदद्योगिक पटल नव्या रूपात परिवर्तित झाले. हवेचे प्रदूषण फैलावणारे उदद्योग हे हळूहळू बंद होऊ लागले. नवी मुंबईच्या स्थापनेसमयी या शहराचे आर्थिक चलनवलन हे मुख्यत: खासगी क्षेत्रातून रोजगार आणि कृषी उत्पादनांचा घाऊक व्यापार आणि प्रक्रियेशी निगडित उपक्रम, लोखंड व पोलाद गोदामे आणि घाऊक बाजारपेठ, बंदराशी संलग्न वाणिज्य आणि औदद्योगिक उपक्रम, तसेच जिल्हा व्यवसाय केंद्रे (डीसीबी) आणि नव विकसित मध्यवर्ती व्यापार जिल्हा (सीबीडी) येथे निवडक खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील कार्यालये, प्रशिक्षण तसेच संशोधन व विकास केंद्रे असे नियोजित होते. १९७०-७१ मध्ये सिडकोच्या स्थापनेसमयी शहराचा एकमेव आर्थिक स्रोत हा ठाणे-बेलापूर पट्ट्यातून निर्माण झालेल्या १६,००० औदद्योगिक नोकऱ्या हाच एकमेव होता; त्या काळी मुंबईतून कामगारांची ने-आण करण्यासाठी येथील कंपन्यांकडून वाहतुकीवर खूप मोठा खर्च केला जात होता.

तथापि माहिती आणि तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व व प्रस्थ लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य शासनाने या उदद्योगाच्या वाढ आणि विकासाला पोषक ठरतील अशी काही क्षेत्रे निश्चित केली. याच पार्श्वभूमीवर १४ जून १९९८ रोजी वाशी येथे आंतरराष्ट्रीय इन्फोटेक पार्कचे उद्घाटन करण्यात आले. हे पार्क अत्यंत समर्पक ठिकाणी वसलेले होते. वाशी रेल्वे स्थानक परिसरातील वाणिज्य संकुलातील ६ लाख चौरस फूट क्षेत्रफळाचा परिसर हा माहिती तंत्रज्ञान उद्यान (आयटीपी) आरक्षित करण्यात आला होता. या ठिकाणाहून व्हीएसएनएल, ह्यूझ इस्पात, एसटीपीआय, इंटरकनेक्टेड स्टॉक एक्सचेंज वगैरे सारख्या कंपन्यांचा कारभार सुरूही झाला होता. नव्या इन्फोटेक पार्कने सुमारे ५०,००० प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण केला.

इंटरनॅशनल टेक्नॉलॉजी सेंटर

इंटरनॅशनल टेक्नॉलॉजी सेंटर

महाराष्ट्रासाठी हा परिसर अभिमानास्पद बाब ठरेल याची काळजी घेत सिडकोने येथे आणखी एका इन्फोटेक केंद्रांचे कार्यान्वयन सुरू केले. बेलापूर क्षेत्र जो मध्यवर्ती व्यापार जिल्हा (सीबीडी) म्हणून ओळखला जात होता, तेथे इंटरनॅशनल टेक्नॉलॉजी सेंटर सुरू झाले. देशभरातील कोणत्याही ठिकाणाशी द्रुतगती महामार्गाद्वारे जोडला गेलेला, तसेच रस्ते, रेल्वे त्याचप्रमाणे जलमार्ग अशा प्रभावी परिवहन सुविधेने समृद्ध असे हे ठिकाण आहे. हे केंद्र रेल्वे स्थानक संकुलातच उभे राहिले. सुंदररीत्या रचना केलेल्या इमारतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानात्मक पायाभूत सोयीसुविधांनी संपन्न १०,००,००० चौरस फूटांचे बांधकाम क्षेत्र यातून उपलब्ध झाले. पुरेसा, विनाखंड व स्थिर वीज पुरवठा, नजीकच्या परिसरात निवासाच्या सुविधा, हेल्थ क्लब्स, सुरचित परिषद सभागृह सुविधा, मुबलक वाहन तळ सुविधांसह उद्यान व बगीचे अशी वैशिष्ट्य असलेले हे केंद्र आयटीसमर्थ सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांसाठी एक आदर्श ठिकाण बनले. साहजिकच आयटी क्षेत्रातील विप्रोसारख्या बड्या कंपनीची येथे लगोलग पदचिन्हे उमटली आणि उपलब्ध विक्रीयोग्य क्षेत्रापैकी १६ टक्के क्षेत्र (१,५६,००० चौरस फूट) एकट्या या कंपनीने घेतले.

बेलापूर किल्ला सौंदर्यीकरण

ऐतिहासिक पार्श्वभूमी

नवी मुंबई परिक्षेत्रातील एकमेव ऐतिहासिक वास्तू म्हणजे बेलापूर किल्ला; जो आज पुरातन अवशेषांच्या रुपात अस्तित्वात आहे. जंजिराच्या सिद्दी लोकांनी हा भूप्रदेश पोर्तुगीजांकडून जिंकून घेतल्यावर इ.स. १५६० ते १५७० दरम्यान या किल्ल्याची बांधणी केली. त्यानंतर पुढील २५० वर्षांत हा किल्ला सिद्यांकडून पुन्हा पोर्तुगीजांनी, पोर्तुगीजांकडून मराठ्यांनी आणि मराठ्यांकडून ब्रिटीशांनी जिंकला होता.

हा किल्ला एके काळी शाबाज म्हणून ओळखलं जात असे. जवळपास असलेलं शहाबाज गाव हे या किल्ल्याच्या जुन्या नावाची साक्ष देते. या किल्ल्याचे बेलापूर किल्ला असे नामकरण चिमाजी आप्पा यांनी केले. बाजीराव पेशवे यांचे कनिष्ठ बंधू चिमाजी आप्पा यांनी इ.स. १७३७ मध्ये पोर्तुगीजांचा पराभव करून मराठ्यांचे निशाण या किल्ल्यावर फडकवले. या किल्ल्याची मोहीम यशस्वी झाल्यास नजिकच्या अमृतेश्वर मंदिरातील भगवान शंकराच्या मूर्तीला बेलाचा हार अर्पण करण्याची शपथ चिमाजी आप्पा यांनी वाहिली होती. विजयानंतर शंकराला प्रिय असलेल्या बेल वृक्षाच्या नावावरून या किल्ल्याला बेलापूर नाव त्यांनी दिले.

हा किल्ला, ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन चार्ल्स ग्रे यांनी इ. स. २३ जून १८१७ रोजी जिंकेपर्यंत, मराठा राजवटीच्या अंमलाखाली होता. या लढाईत या किल्ल्याची मोठ्याप्रमाणात पडझड झाली आणि ब्रिटीश अमदानीत मुंबई इलाख्याचा विस्तार झाल्याने किल्ल्याचे युद्धनीतीतील महत्व राहिले नाही.

स्थळ आणि प्रकल्प

हा किल्ला नवी मुंबईतील आधुनिक स्मारक असलेल्या महानगरपालिका मुख्यालय इमारतीच्या समोर स्थित आहे. येथून या शहरातील आदर्श असा अंतर्गत द्रुतमार्ग, पाम बीच मार्ग सुरु होतो. किल्ल्याचा परिसर सुमारे ५ एकरावर विस्तारला आहे. हा भूप्रदेश सिडकोच्या अखत्यारीत येतो. या ऐतिहासिक वास्तूचे जतन आणि सौन्दार्यीकरण करण्याचा महात्वाकांक्षी प्रकल्प सिडकोने हाती घेतला आहे.

सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, श्री. लोकेश चंद्र यांनी १६ जून २०१९ रोजी या प्रकल्पाचे प्रतिकात्मकरित्या उद्घाटन केले. किल्ल्याच्या भग्नावशेषांचे पुनरुज्जीवन करण्यात करण्याचा या प्रकल्पात अंतर्भाव आहे. 'किमया आर्किटेक्टस्' या ऐतिहासिक वास्तूंचे पुनरुज्जीवन करण्याचा अनुभव असलेल्या स्थापत्य तंत्रज्ञानातील ख्यातनाम संस्थेला सिडकोने या प्रकल्पाचे काम दिले आहे. प्रकल्पाचा अंदाजे खर्च १७ कोटी रुपये एवढं आहे.

भारताच्या गौरवी इतिहासाची पाने उलगडणारा हा प्रकल्प तरुण पिढीसाठी शैक्षणिकदृष्ट्या महत्वपूर्ण ठरेल. भारतीय नाविक दलाचे (आरमार) जनकत्व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे जाते. हिंदवी स्वराज्याच्या सीमा सागरी बाजूने अधिक नाजूक असल्याने राज्याच्या रक्षणासाठी महाराजांनी सागर किनारे संरक्षित केले होते. मराठा राजवटीतील बहुतेक किल्ले सागर किनारी उभारले गेले आहेत. बेलापूर किल्ला हा त्यापैकीच एक असून तो जलदुर्ग प्रकारात त्याची (सागरी किल्ला) गणना होते, यास्तव हा ऐतिहासिक वारासा जतन करणे गरजेचे आहे.              

पुनर्रचना 

 

इतिहास पुनरुज्जीवित करण्यासाठी किल्ल्याच्या सद्यस्थितीतील भग्नावशेषांची पुनर्रचना करण्यात येणार आहे. त्यासाठी ऐतिहासिक वास्तुशैलीचा अवलंब 'किमया आर्किटेक्टस्' करणार आहेत. किल्ल्याचा बुरुज पुनर्स्थापित करून त्याचे रुपांतर परिसर न्याहाळण्याच्या मनोऱ्यात करण्यात येईल. पुनर्रचनेत या परिसराला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यात येईल. किल्ल्याच्या परिसराचे नैसर्गिक रूप अबाधित राखून येथील जैव-विविधता जपण्यात येईल. वाहन प्रदूषणावर अंकुश राखण्यासाठी विजेवर चालणारी वाहनेच तेथे चालविली जातील.

सौंदर्यीकरण

पर्यटन स्थळ आणि सामाजिक-सांस्कृतिक घटनाचे महत्वाचे केंद्र म्हणून किल्ल्याचा विकास करण्यात येणार आहे. प्रवेश परिसरात प्रवेशिका खिडकी, विश्राम कक्ष, वास्तुभांडार आदि पर्यटक सुविधा असतील. प्रवेशद्वाराजवळच किल्ल्यावर जाण्यासाठी हलकीशी चढण तयार करण्यात येईल. बुरुजाच्या पार्श्वभूमीवर नाविन्यपूर्ण बहु-उद्देशीय प्रयोगमंच (अॅम्फीथिएटर) आणि खुला रंगमंच यांची रचना करण्याचे नियोजित आहे. या सर्व सुविधांमुळे या परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम, शिक्षणिक सहल ऐतिहासिक फेरफटका असे कार्यक्रम आयोजित करणे सोयीचे जाणार आहे.

मुख्य वैशिष्ट्ये

  • ध्वनी-प्रकाश सादरीकरणातून किल्ल्याचे कथन
  • पर्यटन स्थळ, शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र
  • मराठा आरमाराचे गौरव उलगडणारे वस्तुसंग्रहालय आणि प्रदर्शन केंद्र
  • वाहनतळ, अल्पोहार क्षेत्र, बहु-उद्देशीय प्रयोगमंच, खुला रंगमंच, बगीचा आणि कारंजे          

 

आगरी-कोळी भवन

नवी मुंबई परिक्षेत्रातील मूळ रहिवासी म्हणजे म्हणजे आगरी-कोळी समाज. उत्स्फूर्त आणि चैतन्यशील संस्कृतिचा संपन्न वारसा लाभलेल्या या मूळ दर्यावर्दी समाजाच्या संस्कृतीची जपणूक आणि संवर्धन करण्याकरणे, समाजाला आदर्श ठरतील अशा उपक्रमांचे आयोजन करणे, त्यांच्यात  सांस्कृतिक-सामाजिक मनोमीलन घडविणे यासाठी आगरी-कोळी संस्कृती भवनाची निर्मिती करण्यात आली आहे. हे भवन नेरूळमधील सेक्टर २४ येथील भूखंड क्रमांक ९ वर पामबीच मार्गाच्या जवळ अगदी मोक्याच्या ठिकाणी वसले आहे. नवी मुंबईच्या केंद्रभागी असणारे नेरूळ हे अन्य नोडसशी बस, रेल्वे आणि वाहतुकीच्या अन्य माध्यमांनी जोडले आहे.

आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र

 

विविध उद्योगांमधील आदान-प्रदानाकरिता सिडकोतर्फे प्रदर्शन केंद्र विकसित करण्यात आले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित या संकुला अंतर्गत प्रदर्शन केंद्र, व्यवसाय केंद्र, सहाय्यभूत सुविधा केंद्र  (ॲन्सिलरी ब्लॉक) समाविष्ट असून LEED च्या ग्रीन बिल्डिंग मानकांनुसार हे संकुल विकसित करण्यात आले आहे.

सिडको प्रदर्शन केंद्र वाशी येथे शीव-पनवेल द्रुतगती महामार्गालगत वाशी येथे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे. 

प्रमुख वैशिष्ट्ये :

  • 7.4 हेक्टर क्षेत्रावर विकसित
  • नवी मुंबईतील (पूर्णत: वातानुकूलित) पहिले प्रदर्शन केंद्र
  • प्रदर्शन गृहाकरिता भूमिगत वायूविजन प्रणाली
  • डेलाइट हार्वेस्टिंग
  • स्वच्छता, बागकामासाठी पाण्याचा पुनर्वापर
  • प्रकल्प खर्च : रु. 279 कोटी 

प्रदर्शन केंद्र (अंदाजे 21,562 चौ.मी.)

  • छोटेखानी कार्यक्रमांकरिता सहाय्यभूत सुविधा, मिटींग रुम, कॅफे, लाऊंज, फुड कोर्ट इ. सुविधांसह दोन भव्य प्रदर्शन गृहे (अंदाजे 5,000 चौ.मी.)
  • अतिरिक्त दालन म्हणून किंवा विशेष समारंभांकरिता मध्यवर्ती सभागृह
  • पहिल्या मजल्यावर सार्वजनिक दालन (अंदाजे 2,600 चौ.मी.), व्यवसाय केंद्र (अंदाजे 7,597 चौ.मी.)
  • रस्त्यापलीकडे मुख्य प्रदर्शन केंद्राचे विस्तारीत दालन
  • प्रथम स्तर : 750 आसन क्षमतेचे सभागृह, प्रवेश मार्गाजवळील स्वागत कक्ष, समिती केंद्र व ओपन प्लाझा
  • द्वितीय स्तर : बॅंक्वेट हॉल, तालीम कक्ष, कर्मचारी क्षेत्र, ॲम्फी थिएटरसह ओपन प्लाझा
  • तृतीय स्तर : भोजन कक्षासह बहुउद्देशिय दालन

सहाय्यभूत सुविधा केंद्र (अंदाजे 780 चौ.मी.)

  • प्रथम स्तर : प्रशासन व देखभाल कार्यालय
  • द्वितीय स्तर : फुड कोर्ट, वाचनालय आणि सामाजिक समारंभ व अन्य सुविधांकरिता अर्धखुले संमेलन क्षेत्र
  • प्रथम स्तर : प्रदर्शन आणि व्यवसाय केंद्राला जोडणारा पूल
  • 450 चारचाकी वाहनांसाठी पार्किंग सुविधा

 

सिडको कलाग्राम, बेलापूर

कला, खादद्यकृती आणि सांस्कृतिक उपक्रमांचे हे कायमस्वरूपी केंद्र विकसित करण्यात आले आहे. सामूहिकरीत्या आयोजित केलेले सांस्कृतिक उपक्रम, भारतभरातील हस्तकला व कलावस्तुंना अर्बन हाटमध्ये हक्काचे प्रदर्शन व विक्री ठिकाण लाभले आहे.हा देखील कलाग्राममधील महत्वपूर्ण घटक आहे. अशा पद्धतीची लोककलेची पेठ असलेले हे कलाग्राम अत्यंत यशस्वी ठरले आहे. या उपक्रमाद्वारे लोककला-हस्तकलेच्या क्षेत्राला मदत होत असून, कला आणि कलाउत्पादनांच्या व्यवसायाकरिता कलावंत व खरेदीदार यांच्यात समन्वयही  साधला जात आहे.

खारघर गोल्फ मैदान

 

गोल्फसारख्या प्रतिष्ठीत खेळाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने आयोजित करून राज्याच्या व देशाच्या पर्यटनास चालना देण्याच्या उद्देशाने सिडकोतर्फे खारघर व्हॅली गोल्फ कोर्स प्रकल्प विकसित करण्यात आला. यामुळे लोकांचे जीवनमान उंचावण्यासही मदत होणार आहे. 

खारघर परिसरातील हिरव्यागार डोंगररांगांची पार्श्वभूमी आणि विस्तीर्ण हिरवीगार जमीन ही गोल्फ कोर्स (गोल्फ मैदान) विकसित करण्यातकरिता अत्यंत साजेशी अशी भौगोलिक परिस्थिती. सदर गोल्फ कोर्स मैदान हे 103 हे. क्षेत्रावर विकसित करण्यात आले असून गोल्फ कोर्समध्ये सिडकोचा मॅग्नम-ओपस गोल्प व कंट्री क्लब, 72 पार व 7,137 यार्डचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे 18 होल्सचे गोल्फ कोर्स यांचा समावेश होतो.

प्रकल्पामध्ये समाविष्ट :

  • क्लब हाउसह पूर नियंत्रणासाठी डिटेन्शन पॉन्ड
  • निवासी वापरासाठी आलीशान व्हीला
  • पंचतारांकित उपहारगृह, निवासी वापरासाठी अपार्टमेन्ट/बंगले
  • गोल्फ ॲकॅडमी: कंट्री क्लबसह आंतरराष्ट्रीय दर्जाचे गोल्फ कोर्स
  • प्रकल्प खर्च- रु. 50.35 कोटी

 

भविष्यातील परिचालन आणि देखभाल

गोल्फ कोर्स व कंट्री क्लबकरिता आवश्यक असलेल्या पायाभूत व सहाय्यभूत सुविधा विकिसत केल्यानंतर पूर्वनिश्चित उपक्रमांकरिता परिचालन आणि देखभाल (O & M) करण्यासाठी गोल्फ कोर्स खासगी संस्थेकडे सोपविण्यात येईल.

सेन्ट्रल पार्क, खारघर

मूळ निसर्गरम्य पार्श्वभूमी व उच्च दर्जाचे स्थापत्य यांचा कल्पकतेने मेळ साधत सिडकोतर्फे नागरिकांना उच्च दर्जाच्या सांस्कृतिक सुविधा देण्याच्या उद्देशाने सेंट्रल पार्क उद्यान विकसित करण्यात आले आहे. लंडन येथील हाइड पार्क आणि न्यूयॉर्क येथील सेंट्रल पार्क यांच्या धर्तीवर सेंट्रल पार्क उद्यान हे आंतरराष्ट्रीय मानकांनुसार विकसित करण्यात आले आहे. नवी मुंबईतील सर्वांत मोठा नोड् व मुंबई महानगर प्रदेशाचा भाग असणाऱ्या खारघर येथील मध्यवर्ती जागा सेंट्रल पार्क विकसित करण्याकरिता निश्चित करण्यात आली.

खारघर येथील हिरव्या डोंगररांगा आणि खाडी दरम्यान विकसित करण्यात आलेल्या सेंट्रल पार्क मैदानातून डोंगरांकडून खाडीकडे वाहत जाणारे निर्झर आणि त्यांभोवतीची वृक्षराजी यांचा अत्यंत कल्पकतेने वापर करण्यात आल्याने सेंट्रल पार्क निसर्गसौंदर्याने समृद्ध आहे. पहिल्या टप्प्यात सेक्टर-23 आणि दुसऱ्या टप्प्यात सेक्टर-24 आणि 25 मध्ये सेंट्रल पार्क प्रकल्प विकसित करण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यात विकसित करण्यात आलेल्या सेंट्रल पार्कचे उद्घाटन 23 जानेवारी, 2010 रोजी सेंट्रल पार्कमधील ॲम्फी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या नवी मुंबई फेस्टिव्हलमधील संगीतकार प्रितम यांच्या सांगितीक कार्यक्रमाद्वारे करण्यात आले तर 25 जानेवारी, 2010 रोजी मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते प्रकल्पाचे औपचारिकरीत्या उद्घाटन संपन्न झाले. औपचारिक उद्घाटनानंतर 26 जानेवारी, 2010 रोजी ॲम्फी थिएटरमध्ये गायक, संगीतकार व अभिनेते सोनू निगम यांच्या संगीतविषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

पाम बिच मार्ग

पाम बीच मार्ग हा 12 किमी लांबीचा शहरांतर्गत द्रुतगती मार्ग आहे. ठाणे बेलापूर रस्त्यावर पावणे येथे सुरु होऊन बेलापूर-सीबीडी येथे आम्र मार्गावर संपतो. ठाणे बेलापूर रस्त्याने पावणापासून ते सायन-पनवेल महामार्गपर्यंत 3.2 किमी लांबीचा एक भाग सध्या अस्तित्वात होता. पाम बीच मार्ग हा नवी मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावरुन अंतरावरील शहरांच्या वाहतूकीची जलद हालचाल करण्यासाठी विकसित आहे. तो वाशी, सानपाडा, नेरुळ आणि बेलापूर मधील आंतर-नोडल रहदारीसाठी सेवा देत आहे. या रस्त्यासाठी मानखुर्द-बेलापूर रेल्वेमार्गावर सायन-पनवेल महामार्गावर आणि आरओबी येथे इंटरचेंज सुविधा प्रदान करण्यात आली आहे. सर्व चौकांची रचना अशी करण्यात आली आहे की तिथे वेग वाढवताही येईल तसेच नियंत्रितही करता येईल.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक

मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याबरोबरच नवी मुंबई शहराचा विकास करण्याच्या उद्देशाने मुंबई पारबंदर प्रकल्पाचा प्रस्ताव सुमारे ३० वर्षांपासून विचाराधीन होता. राज्य शासनाने ४ फेब्रुवारी २००९ रोजी हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे सोपवला. रस्ते वाहतूक प्रकल्प म्हणून नियोजित असलेल्या या प्रकल्पाला शासनाने ८ जून २०११ रोजी प्रादेशिक विकास प्रकल्पाचा दर्जा दिला.     

मुंबई व नवी मुंबई मधील वाहतूक वेगाने व्हावी यासाठी न्हावा-शेवा (नवी मुंबई) आणि शिवडी (मुंबई) दरम्यान २२ कि. मि लांबीच्या सहा पदरी दुहेरी (३+३ मार्गिका) पुलाचा अंतर्भाव यात आहे. या पुलाची समुद्रावरील लांबी १६.५ कि. मि., जमिनीवरील पोहोचमार्ग (अप्रोच रोड) पुलाची लांबी ५.५. कि.मि. असेल. तसेच शिवडी, नवी मुंबईतील शिवाजी आणि चिर्लेनजिक महामार्ग ४ ब वर मार्ग बदलण्यासाठी फाटे देण्यात येणार आहेत.

या पारबंदर प्रकल्पाला जायका अर्थात जपान इंटरनॅशनॅल कोऑपरेशन (जेआयसीए) यांनी अर्थसहाय्य देण्यास मंजुरी दिली आहे. त्यांनी प्रकल्पाची अंदाजे किमत रु. १७, ८४३ एवढी मुक्रर केली आहे. या प्रकल्पाच्या विकासासाठी एमएमआरडीएची नोडल एजन्सी म्हणून नेमणूक झाली आहे. सदर प्रस्तावित प्रकल्पामुळे नवी मुंबई सुकर रहदारीने नवी मुंबईशी जोडली जाईल व व्यापार-उदिमास चालना मिळेल.

पारबंदर प्रकल्पामुळे न. मु. आं. विमानतळाकडे त्वरित पोहचवणारा मार्ग मिळणार आहे. नवी मुंबई आणि कोंकण यातील अंतर कमी होऊन वेळ व इंधन बचतही होईल. परिणामी नवी मुंबई व रायगडमधील विकासास चालना मिळेल. सिडको, एनएमएमसी आणि जेएनपीटी हे लाभार्थी या प्रकल्पाच्या विकासासाठी आपापला सहभाग देतील.केंद्रीय पर्यावरण, वणे व हवामान बदल मंत्रालयाने सागरी नियमन क्षेत्र तसेच पहिल्या टप्प्यासाठी वन क्षेत्राची जमीनीतून मार्ग काढण्यास परवानगी दिली आहे. टप्पा १, २ व ३ साठी निविदा प्राप्त झाल्या असून स्वीकार पत्र प्रदान करण्यात आले आहे.

नवी मुंबई विशेष आर्थिक क्षेत्र

विशेष आर्थिक क्षेत्र  म्हणजे काय?

नवी मुंबई स्पेशल इकॉनॉमिक झोन (एनएमईईझेड) एक विशेष कर्तव्य मुक्त आंतरजाल आहे (नवी मुंबईच्या 3 नोडस्मध्ये द्रोणागिरी (13 9 0 हे), उलवे (400 हे) आणि कळंबोली (350 हे.) नवी मुंबईच्या 2,140 हे. क्षेत्रावर पसरलेले आहे. एका अप्रत्यक्ष व्यावसायिक वातावरणात - एकीकडे व्यापार आणि वित्तीय सेवांपर्यंत इतर उत्पादनांपेक्षा - परदेशी गुंतवणूकींना आर्थिक व्यवहाराच्या व्यापक श्रेणीत प्रोत्साहन देण्यासाठी डिझाइन केले आहे.

एक मानलेला परदेशी प्रदेश म्हणून कार्य; एनएमईझेडला देशातील बहुतांश आर्थिक कायद्यांमधून सूट देण्यात येईल. याशिवाय, जागतिक दर्जाची सोय सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातील औद्योगिक कार्याला चालनास मदत करेल आणि विशेषतः नवी मुंबई, या सेझची मुख्य ऑफर असेल.
हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी सहभागातून राबवला जात आहे आणि सिडकोने जागतिक बोलीदरम्यान प्रक्रियेद्वारे निवड केली आहे. सिडको आणि या मोक्याचा गुंतवणूकदारांनी एक विशेष कंपनी स्थापन केली आहे; कंपनी कायदा 1 9 56 अन्वये नोंदणीकृत मेसर्स एनएमईझेड प्रा. लि., प्रगती वाढविण्यासाठी

या प्रकल्पाच्या माध्यमातून 5 लाखांपेक्षा जास्त लोकांना प्रत्यक्ष रोजगार देण्याची अपेक्षा आहे. सिडकोने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सुमारे 25 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली आणि 5 लाख रोजगारांची निर्मिती केली. देशातील वाणिज्यिक केंद्र आणि आर्थिक राजधानी - एनएमएसईझेडमध्ये असलेल्या युनिट्सला राजधानीसाठी अमर्यादित प्रवेश प्रदान करेल.

जवाहरलाल नेहरू पोर्ट आणि मुंबई बंदर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी आवश्यक दुवे प्रदान करतात. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ 60 9 0 मिनिटांच्या अंतरावर आहे. अंदाजे याशिवाय, कोकण रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या दोन्ही भागांना प्रवेश मिळू शकतो. दक्षिण मुंबई ते एनएमईईईझेला जोडणारे पाणी वाहतूक प्रस्तावित आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) आणि आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला क्षेत्रास सुलभतेने वाढविण्यासाठी अपेक्षित आहे.

(एनएमईईझेड) एक विशेष कर्तव्य मुक्त आंतरजाल आहे (नवी मुंबईच्या 3 नोडस् म्हणजेच द्रोणागिरी (13 9 0 हे), उलवे (400 हे) आणि कळंबोली (350 हा)] आर्थिक व्यवहाराच्या व्यापक श्रेणीत परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी बनवले आहे - एका निपुण व्यवसाय व्यव्स्थापनात - एका बाजुस मधून व्यापार आणि वित्तिय सेवांमधून - एक मानलेला परदेशी प्रदेश म्हणून कार्य; एनएमईझेडला देशातील बहुतांश आर्थिक कायद्यांमधून सूट देण्यात येईल.

याशिवाय, जागतिक दर्जाची सोय सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातील औद्योगिक कार्याला चालनास मदत करेल आणि नवी मुंबई विशेषतः या सेझची मुख्य ऑफर असेल.

हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी सहभागातून राबवला जात आहे आणि सिडकोने जागतिक बोलीदरम्यान प्रक्रियेद्वारे निवड केली आहे. सिडको आणि या मोक्याचा गुंतवणूकदारांनी एक विशेष कंपनी स्थापन केली आहे; कंपनी कायदा 1 9 56 अन्वये नोंदणीकृत मेसर्स एनएमईझेड प्रा. लि., प्रगती वाढविण्यासाठी

या प्रकल्पाच्या माध्यमातून 5 लाखांपेक्षा जास्त लोकांना प्रत्यक्ष रोजगार देण्याची अपेक्षा आहे. सिडकोने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सुमारे 25 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली आणि 5 लाख रोजगारांची निर्मिती केली. देशातील वाणिज्यिक केंद्र आणि आर्थिक राजधानी - एनएमएसईझेडमध्ये असलेल्या युनिट्सला राजधानीसाठी अमर्यादित प्रवेश प्रदान करेल.

जवाहरलाल नेहरू पोर्ट आणि मुंबई बंदर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी आवश्यक दुवे प्रदान करतात. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ 60 9 0 मिनिटांच्या अंतरावर आहे. अंदाजे याशिवाय, कोकण रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या दोन्ही भागांना प्रवेश मिळू शकतो. दक्षिण मुंबई ते एनएमईईईझेला जोडणारे पाणी वाहतूक प्रस्तावित आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) आणि आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला क्षेत्रास सुलभतेने वाढविण्यासाठी अपेक्षित आहे.

वि. आ. क्षे लाभ
कुशल मनुष्यबळ
हा प्रकल्प 5 लाखापेक्षा अधिक लोकांना प्रत्यक्ष रोजगार निर्मिती करणे अपेक्षित आहे.
मोठ्या शहरांमध्ये मुंबई महानगर प्रदेश, नवी मुंबई आणि पुणे या राज्यांमधील सुमारे 15 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या एसएझेडची उपलब्धता आहे.
एनएमझेडझच्या मुंबईशी जवळून वित्त पुरवण्यासाठी - देशातील व्यावसायिक केंद्र आणि आर्थिक राजधानी - एनएमझेडईझेडमध्ये असलेल्या युनिट्सला राजधानीसाठी अमर्यादित प्रवेश प्रदान करेल. प्रकल्प किंमत सुमारे `6,300 कोटी अंदाज आहे आणि 10 वर्षाच्या कालावधीमध्ये ते कार्यान्वित करावयाचे आहे. सिडकोने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सुमारे 25 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली आणि 5 लाख रोजगारांची निर्मिती केली

भौतिक पायाभूत सुविधा 
जवाहरलाल नेहरू पोर्ट आणि मुंबई बंदर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी आवश्यक दुवे प्रदान करतात. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ 60 9 0 मिनिटांच्या अंतरावर आहे. अंदाजे याशिवाय, कोकण रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या दोन्ही भागांना प्रवेश मिळू शकतो.दक्षिण मुंबई ते एनएमईईईझेला जोडणारे पाणी वाहतूक प्रस्तावित आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) आणि आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला क्षेत्रास सुलभतेने वाढविण्यासाठी अपेक्षित आहे.

मलप्रवाह प्रक्रिया संयंत्र
न्यू पनवेल व कामोथेसाठी सीवेज ट्रीटमेंट प्लांट (एसटीपी) हे प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर (पीएलसी) आणि सुपरवायझरी कंट्रोल ऑटोमॅटिक ऍण्ड डेटा प्राप्ती (एससीडीए) चा समावेश असलेल्या सर्व सिस्टम व्हेरिएबल्सवर स्वयंचलित नियंत्रण आणि नियंत्रण आहे. हे एसबीआर तंत्रज्ञानावर आधारीत आहे जे एक बॅच प्रक्रिया आहे जे सततच्या यंत्रणेची अक्षमता काढून टाकते जसे सक्रिय सळ प्रक्रिया. एक एरोबिक जैविक प्रक्रिया जेथे एका टाकीमध्ये वायुवीजन, रचना आणि सच्छिद्रता निर्माण होते ती वनस्पतीची ओळख आहे.

वर्तमान स्थिती
कंत्राटदारांची पूर्व-पात्रता निश्चित केली
निविदा प्रक्रियेस सुरुवात

पायाभूत सुविधा प्रवेश

जवाहरलाल नेहरू पोर्ट आणि मुंबई बंदर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी आवश्यक दुवे प्रदान करतात. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ 60 9 0 मिनिटांच्या अंतरावर आहे. अंदाजे याशिवाय, कोकण रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या दोन्ही भागांना प्रवेश मिळू शकतो.दक्षिण मुंबई ते एनएमईईईझेला जोडणारे पाणी वाहतूक प्रस्तावित आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) आणि आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला क्षेत्रास सुलभतेने वाढविण्यासाठी अपेक्षित आहे.

ग्राम विकास भवन

खारघर सेक्टर २१ (प्लॉट ७६-ए) येथे ग्रामविकास भवन पूर्ण करून ते ११ जुलै २०१७ रोजी ग्रामीण विकास आणि जल संवर्धन विभाग, राज्य शासन यांस सुपूर्द केले. सिडकोने सल्लागार तत्वावर याचे नियोजन व आरेखन केले आहे. पंचायत राज व्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ग्रामीण कल्याण योजना राबविणाऱ्या राज्यातील प्रतिनिधींसाठी ४१३७.३९ चौ.मी. क्षेत्रावर बांधण्यात आलेल्या या इमारतीत निवास, भोजन आणि प्रशिक्षण सुविधा येथे पुरविल्या जातील. कार्य-कौशल्य क्षमता विकास प्रशिक्षण कार्यक्रम येथे आयोजित केले जातील.

बांधकाम ढाचा सल्लागार म्हणून रेडिअस डिझाईन सोल्यूशन्स आर्किटेक्ट/कन्सल्टंट्स आणि सुनील मुतालिक व एसोसिएट्स यांची सिडकोची नेमणूक केली होती. आयआयटी, पवई, मुंबई हे आरसीसी सल्लागार होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त सचिव श्री. एम. व्ही. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्रयस्थ लेखापरीक्षक म्हणून विमल सोल्युशन्स यांची नेमणूक करण्यात आली होती. तळ मजला अधिक ५ माजले असणाऱ्या इमारतीत ५०० व्यक्तींसाठी एक सभागृह, १०० लोकांसाठी कार्यशाळा हॉल, १२० व्यक्तींसाठी निवास सुविधा असेल.

विज्ञान नगरी

विज्ञान शहर
भारतातील राष्ट्रीय विज्ञान धोरणानुसार मुलांबरोबरच प्रौढांमधे वैज्ञानिक मूल्ये उभारायची सुरुवात, 
'विज्ञान शहर' प्रकल्प सिडकोची प्रामाणिक प्रयत्नांना युवा पिढीला त्यांच्या श्रद्धेला एक वैज्ञानिक दृष्टीकोन देण्याच्या प्रयत्नात आहे. 
सायन्स पार्कमध्ये मुलांना काय हवे आहे याची माहिती मिळवण्यासाठी सिडकोने 'द सॅन्सिन पार्क ऑफ माय सपनों' नावाचे एक निबंध स्पर्धा आयोजित केली होती. नवी मुंबईतील या अद्वितीय प्रकल्पाचा आकार वाढवण्यासाठी मुलांना त्यांच्या निबंधांतून लिहिलेल्या कल्पनांचा वापर केला जाईल. 
1. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम या प्रकल्पासाठी मार्गदर्शक प्राधिकरण आहेत. 
2. खारघर रेल्वे स्थानकापासून चालत जाण्याच्या अंतरावर 18.55 हेक्टर क्षेत्रावर पसरलेले आहे. 
3. नैसर्गिक परिसर आणि उत्कृष्ट प्रवेश

कोस्टल रोड

जवाहरलाल नेहरु बंदर आणि सध्याची लोकसंख्या यांना अधिक सुविधा पुरविण्यासाठी सिडकोने द्रोणागिरी येथे नियोजनबध्द एकात्मिक उपनगर विकसित केले आहे. इथे विकसित झालेल्या व्यावसायिक उपक्रमांना पूरक निवासी क्षेत्र, ट्रक टर्मिनल, सामाजिक सुविधा आणि १२.५% योजना आखण्यात आली आहे.

मोठ्याप्रमाणात होत असलेल्या कंटेनर वाहतुकीमुळे रहदारीवर पडणारा ताण कमी करण्यासाठी सागर मार्गाची निकड निर्माण झाली आहे. त्याअनुशंगाने नवघर आणि चांजे दरम्यान ८.३० किलोमीटर लांबीचा किनारपट्टीचा साग रस्ता तयार करण्याची योजना आहे. द्रोणागिरी नोडमधील ४-बी राष्ट्रीय महामार्गाशी तो जोडला जाईल. नवघर ते बोकडविरा हा टप्पा ५,४० कि.मी. तर बोकडविरा ते चांजे टप्पा २.०० कि.मी. लांबीचा आहे. नवघर-बोकडविरा हा पट्टा ६ पदरी तर, बोकडविरा-चांजे हा पट्टा ४ पदरी प्रस्तावित आहे. दोन्ही बाजूस २ क्ष .५० मीटरचे पदपथ व २ क्ष २ मिदारचे कच्चे रस्ते असतील. नवघर ते बोकडविरा टप्प्यातील काम सुरू आहे.

साठवण तलाव क्रमांक ३-ए, ३ व ४ जोडण्यासाठी आरसीसी कॉक्रीटच्या कमान पूलांचा वापर करण्यात येणार आहे. हे तलाव द्रोणागिरी येथे सागर मार्गाशी जोडले जातील. जड वाहनाच्या वाहतुकीसाठी रस्ते अधिक सक्षम व्हावेत म्हणून मुरुमावर ६ मि.मीटरचा खडीचा थर टाकण्यात येईल. पदपथ दिवे, वाहतूक संदेश फलक, मार्गिका आरेखांकन या सुविधा पुरविण्यात येतील.

खारघर टेकडी पठार

खारघर पठार हा पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतराजीचा समुद्र सपाटी पासून सुमारे २०० मीटर उंचीवरला भाग आहे. खारघर डोंगराळ भागावरील सुमारे १५० हेक्टरच्या क्षेत्रातील १०० हेक्टर प्रदेश सिडकोच्या अखत्यारीत आहे. खाजगी-सार्वजनिक सहभागाच्या (पीपीपी) आधारे हा हिरवाईने नटलेला, शांत आणि नयनरम्य परिसर विकसित करण्याचा सिडकोचा विचार आहे.या प्रकल्पात सिडकोचे समभाग असतील.

नवी मुंबईच्या केंद्रस्थानी असणाऱ्या या पठाराचा विकास विशिष्ट विषयाला वाहिलेला असेल; त्याने नवी मुंबईला जगातिक चेहरा प्रदान करणारे पर्यटन विकसित करावे, प्रकल्प स्वबळावर चालून महसूल निर्माण करावा असा सिडकोचा उद्देश आहे. या परिसराकडे शहराच्या कोणत्याही भागातून पोहोचणे सुलभ व्हावे अशी सुविधा अपेक्षित आहे.

नेरूळ-खारकोपर दरम्यान उपनगरी रेल्वे सेवेचा प्रारंभ

सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या नेरूळ/सीवूड्स-उरण या रेल्वे मार्गाचे दि. 11 नोव्हेंबर, 2018 रोजी मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते उद्घाटन होऊन सदर मार्गावरील नेरूळ ते खारकोपर स्थानकांदरम्यान उपनगरीय रेल्वे सेवेस प्रारंभ झाला. एकूण 27 कि.मी. लांबी व  10 रेल्वे स्थानके असलेला हा मार्ग दोन टप्पांमध्ये विकसित करण्यात येणार आहे. पहिला टप्पा हा सिवूड्स-खारकोपर आणि बेलापूर-सागरसंगम असा 12 कि.मी. चा आहे.

पहिल्या टप्प्यातील प्रस्तावित 5 रेल्वे स्थानकांपैकी 2 स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात पुढील रेल्वे स्थानके विकसित करण्यात येतील :

सीवूड्स, सागरसंगम, तरघर, बामणडोंगरी आणि खारकोपर. दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित स्थानके विकसित करण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. सदर रेल्वे मार्गामुळे नवी मुंबईच्या अति दक्षिणेकडील नोड् हे उर्वरित नवी मुंबई तसेच मुंबईला अधिक सुलभरित्या जोडले जाणार आहेत.