घर सर्वेक्षण


मालमत्ता तपशील शोधण्यासाठी येथे क्लिक करा  

सिडको विकसित मालमता

सिडको विकसित मालमत्तांचे सर्वेक्षण

१५ फेब्रुवारी २०१७ आणि १५ मे २०१८ दरम्यान सिडकोने विकसित केलेली घरे (सदनिका) आणि दुकाने यांचे सर्वेक्षण करण्यात आले. पणन विभागाच्या मागणीनुसार सांख्यिकी विभागाने ध्रुव कन्सल्टन्सीद्वारे हे सर्वेक्षणकरवून घेतले. मालमात्ता उपभोगत्यांनी सादर केलेले दस्तावेज शहर सेवा १ व २ च्या रेकॉर्डवरून सत्यापित करण्यात आले.

१९७० पासून सिडकोने बांधलेल्या मालमत्तांची पहिल्या खरेदिदारापासून तर सध्याच्या उपभोगत्यापर्यंतची माहीती या सर्वेक्षणाद्वारे उपलब्ध झाली आहे. अधिक महसूल निर्मितीसाठी विक्री न झालेल्या तसेच वापरत नसलेल्यामालमत्तांची अधिकृत माहिती जमविणे हा या मागचा हेतू होता. यात प्रत्येक नोडमधील गृहनिर्माण प्रकल्प, नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था आणि राहती घरे यांची वर्षनिहाय माहिती देण्यात आली आहे.     

पारदर्शकता धोरणास अनुसरून सिडको आपल्या वेबसाइटद्वारे ही सर्व माहिती नागरींसाठी खुली करत आहे. नागरिक या  पोर्टलवर त्यांच्या मालमत्तेची माहिती तपासू आणि सत्यापित करू शकतात. आपला वैयक्तिक तपशील सुधारणे व अद्ययावत करण्याची सुविधा सुद्धा सांख्यिकी विभागामार्फत येथे देण्यात आली आहे.

नागरिकांनी त्यासाठी हे करावे:

• आपल्या सिस्टीमवर मोबाइल क्रमांक नोंद करा संबंधित मोबाईल हँडसेटवर OTP प्राप्त होईल  

• नोंदणीसाठी आणि लॉग-इनसाठी सिस्टममध्ये OTP पुन्हा प्रविष्ट करा

• आपल्या निवास/व्यावसायिक विभागाची माहिती प्रदर्शित केली जाईल

• मालमत्तेशी संबंधित कागदपत्रांसाठी येथे क्लिक करा