मुख्य दक्षता अधिकारी यांचा संदेश
सिडकोमधील भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढा यशस्वी करण्यासाठी नागरिकांचा पुढाकार व सहयोग आवश्यक आहे. भ्रष्टाचार मुक्तीच्या या कार्यात दक्षता विभाग नेहमीच नागरिकांच्या पाठीशी आहे.
सिडकोच्या कार्यालयीन कामकाजासाठी आपणास कुणी लाच मागितली तर देऊ नका. कारण लाच घेणे व देणे हे दोन्ही गुन्हे आहेत. त्यामुळे तुमच्याकडे सिडकोमधील भ्रष्टाचाराबद्दल काही माहिती असेल किंवा तुम्ही सिडकोमध्ये भ्रष्टाचाराचा बळी ठरला असाल तर तुम्ही मुख्य दक्षता अधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवू शकता. तुमच्या तक्रारीची वेळीच दाखल घेतली जाईल याची मी तुम्हाला खात्री देतो.
नागरिक आमच्याकडे चार प्रकारे आपली तक्रार नोंदवू शकतात. ते पुढीलप्रमाणे, लिखित तक्रार करुन, ई-मेलव्दारे ऑनलाइन तक्रार करुन, दक्षता विभागाच्या ‘दक्षता’ पोर्टलवर तक्रार लॉग इन करुन आणि सिडको भवन येथील सहाव्या मजल्यावरील दक्षता विभागाच्या कार्यालयात मला प्रत्यक्ष भेटून तोंडी तक्रार करु शकतात.
एक निकोप, शिस्तबद्ध आणि जबाबदार कामकाजाचे वातावरण आपल्या सभोवताली निर्माण करण्याकरिता, त्याची वाढ करण्याकरिता व ते कायम राखण्याकरिता आम्हाला सहकार्य करा. एकमेकांना सहाय्य करूनच आपल्याला अपेक्षित असलेला बदल आपणच सिडकोमध्ये घडवू शकतो.
“चला भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देऊ या, सिडकोला भ्रष्टाचार-मुक्त करूया".
तक्रार कशी नोंदवावी
सिडको कार्यालयातील भ्रष्टाचाराबाबत तक्रार कशी नोंदवावी ?
(तक्रार प्रक्रिया पुस्तिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा)
कर्मचारी / नागरिक आमच्याकडे चार प्रकारे तक्रार नोंदवू शकतात जसे, लिखित तक्रार, ई-मेल करुन ऑनलाइन तक्रार, दक्षता विभागाच्या पोर्टलवर लॉग इन तक्रार आणि सिडको भवनच्या सहाव्या मजल्यावरील दक्षता विभागाच्या कार्यालयात मा. मुख्य दक्षता अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून नोंदविलेली तक्रार.
सिडकोचे कर्मचारी / अधिकारी यांच्या विरुध्द भ्रष्टाचार, गैरवर्तणूक किंवा गैरव्यवहार याबाबत कोणत्याही स्रोताद्वारे आलेली माहिती ही तक्रार मानली जाते. लाच मागण्याबाबत ई-मेल व दक्षता पोर्टलवर तक्रार प्राप्त झाल्यानंतर दक्षता विभागाद्वारे त्याची योग्य दाखल घेतली जाते. दक्षता विभागाच्या वतीने नागरीकांना आग्रहाचे जाहीर आवाहन करण्यात येत आहे कि, भ्रष्टाचारचा बळी ठरलेल्या नागरिकांनी दक्षता विभागाकडे तक्रार करावी ज्यामुळे आम्हाला सिडको प्रशासनातील कारभार अधिक पारदर्शक करता येईल.
गोपनीयता
तक्रारदाराने आपली ओळख गुप्त ठवावी अशी विनंती केल्यास दक्षता विभाग हे गोपनीयता बाळगण्यास कटिबद्ध आहे.
तक्रारीचे स्रोत
सिडकोचे कर्मचारी / अधिकारी यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन, गैरव्यवहार भ्रष्टाचार झाल्यास त्याबाबतची माहिती/ तक्रार खाली दिलेल्या कोणत्याही स्त्रोतामार्फत प्राप्त झाल्यास त्याची दखल मुख्य दक्षता अधिकारी यांच्या कार्यालयाकडून घेण्यात येईल.
- प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून अथवा कर्मचारी / नागरिक यांच्याकडून आलेली तक्रार
- विभागीय निरीक्षण किंवा पडताळणी अहवाल
- लेखापरीक्षणात आढळून आलेला आर्थिक गैरव्यवहार उदा. कागदोपत्री खाडाखोड, वाजवीपेक्षा अधिक रक्कम आकारणे, पैश्याचा किंवा साहित्याचा गैरव्यवहार, आर्थिक घोटाळा
- वृत्तपत्रे वा अन्य प्रसार माध्यमांमध्ये छापून आलेले भ्रष्टाचाराच्या आरोपाचे वृत्त
- ओळखता येण्याजोग्या माध्यमांकडून तोंडी माहिती / तक्रार प्राप्त झाल्यास त्याचे लेखी रूपांतर
- पोलीस किंवा तत्सम गुप्तचर यंत्रणेमार्फत प्राप्त झालेला अहवाल
- कर्मचाऱ्यांनी केलेला शिस्तभंग व अनियमितता याबाबत मुख्य दक्षता अधिकारी यांनी मार्गदर्शन केल्यानुसार मिळविलेली माहिती
Register User
Please Note : Above information provided by the user will be kept as confidential.
Forgot Password