तात्कालिक सेवा कक्ष
मध्यवर्ती तक्रार नोंदणी यंत्रणा
प्रस्तावना
मध्यवर्ती तक्रार नोंदणी यंत्रणा २४X७ कार्यरत असते. सिडकोशी संबधित सामान्य तक्रारी व्हॉट्सअॅप ८८७९४ ५०४५० क्रमांकावर नोंदविता येतील. अशा तक्रारी मध्यवर्ती नियंत्रण कक्षात संबधित विभागांना ऑन लाईन पाठविल्या जातात.
तक्रार करण्यासंदर्भातील नागरिकांना नेहमी पडणारे प्रश्न
या पोर्टलवर तक्रार कशी करावी
घर, कार्यालय किंवा सायबर कॅफेमधून आमच्या सामान्य तक्रारी सिटीझन पोर्टलवरील ऑन लाईन तक्रार नोंदणी अर्ज भरा
सामान्य तक्रारी पोर्टलवर तक्रार कशी करावी?
अर्जदाराने ऑन लाईन तक्रार नोंदवावी. संगणक यंत्रणेद्वारे विशेष तक्रार क्रमांक तयार होतो.
ऑन लाईन नोंदविलेल्या तक्रारीवर पुढील कार्यवाही कशी होते?
कार्यवाहीदरम्यान तक्रार संबधित अधिकाऱ्याद्वारे सिडकोच्या योग्य अधिकाऱ्याकडे सोपविली जाते. सदर अधिकारी तक्रारीचे निवारण करून त्याची सद्यस्थिती पोर्टलवर नमूद करतो.
अर्जाच्या कार्यवाहीचा पाठपुरावा कसा करावा/ सद्यस्थिती कशी जाणून घ्यावी?
“तक्रार सद्यस्थिती जाणून घ्या” या पोर्टलवरील सुविधेचा उपयोग करून अर्जदाराला त्याच्या तक्रारीच्या कार्यवाहीचा पाठपुरावा करता येईल. ही सुविधा वापरण्यासाठी विशेष तक्रार क्रमांक आवश्यक आहे.