आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र
विविध उद्योगांमधील आदान-प्रदानाकरिता सिडकोतर्फे प्रदर्शन केंद्र विकसित करण्यात आले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित या संकुला अंतर्गत प्रदर्शन केंद्र, व्यवसाय केंद्र, सहाय्यभूत सुविधा केंद्र (ॲन्सिलरी ब्लॉक) समाविष्ट असून LEED च्या ग्रीन बिल्डिंग मानकांनुसार हे संकुल विकसित करण्यात आले आहे.
सिडको प्रदर्शन केंद्र वाशी येथे शीव-पनवेल द्रुतगती महामार्गालगत वाशी येथे अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे.
प्रमुख वैशिष्ट्ये :
7.4 हेक्टर क्षेत्रावर विकसित
- नवी मुंबईतील (पूर्णत: वातानुकूलित) पहिले प्रदर्शन केंद्र
- प्रदर्शन गृहाकरिता भूमिगत वायूविजन प्रणाली
- डेलाइट हार्वेस्टिंग
- स्वच्छता, बागकामासाठी पाण्याचा पुनर्वापर
- प्रकल्प खर्च : रु. 279 कोटी
प्रदर्शन केंद्र (अंदाजे 21,562 चौ.मी.)
- छोटेखानी कार्यक्रमांकरिता सहाय्यभूत सुविधा, मिटींग रुम, कॅफे, लाऊंज, फुड कोर्ट इ. सुविधांसह दोन भव्य प्रदर्शन गृहे (अंदाजे 5,000 चौ.मी.)
- अतिरिक्त दालन म्हणून किंवा विशेष समारंभांकरिता मध्यवर्ती सभागृह
- पहिल्या मजल्यावर सार्वजनिक दालन (अंदाजे 2,600 चौ.मी.), व्यवसाय केंद्र (अंदाजे 7,597 चौ.मी.)
- रस्त्यापलीकडे मुख्य प्रदर्शन केंद्राचे विस्तारीत दालन
- प्रथम स्तर : 750 आसन क्षमतेचे सभागृह, प्रवेश मार्गाजवळील स्वागत कक्ष, समिती केंद्र व ओपन प्लाझा
- द्वितीय स्तर : बॅंक्वेट हॉल, तालीम कक्ष, कर्मचारी क्षेत्र, ॲम्फी थिएटरसह ओपन प्लाझा
- तृतीय स्तर : भोजन कक्षासह बहुउद्देशिय दालन
सहाय्यभूत सुविधा केंद्र (अंदाजे 780 चौ.मी.)
- प्रथम स्तर : प्रशासन व देखभाल कार्यालय
- द्वितीय स्तर : फुड कोर्ट, वाचनालय आणि सामाजिक समारंभ व अन्य सुविधांकरिता अर्धखुले संमेलन क्षेत्र
- प्रथम स्तर : प्रदर्शन आणि व्यवसाय केंद्राला जोडणारा पूल
- 450 चारचाकी वाहनांसाठी पार्किंग सुविधा