खारघर टेकडी पठार

खारघर पठार हा पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतराजीचा समुद्र सपाटी पासून सुमारे २०० मीटर उंचीवरला भाग आहे. खारघर डोंगराळ भागावरील सुमारे १५० हेक्टरच्या क्षेत्रातील १०० हेक्टर प्रदेश सिडकोच्या अखत्यारीत आहे. खाजगी-सार्वजनिक सहभागाच्या (पीपीपी) आधारे हा हिरवाईने नटलेला, शांत आणि नयनरम्य परिसर विकसित करण्याचा सिडकोचा विचार आहे.या प्रकल्पात सिडकोचे समभाग असतील.

नवी मुंबईच्या केंद्रस्थानी असणाऱ्या या पठाराचा विकास विशिष्ट विषयाला वाहिलेला असेल; त्याने नवी मुंबईला जगातिक चेहरा प्रदान करणारे पर्यटन विकसित करावे, प्रकल्प स्वबळावर चालून महसूल निर्माण करावा असा सिडकोचा उद्देश आहे. या परिसराकडे शहराच्या कोणत्याही भागातून पोहोचणे सुलभ व्हावे अशी सुविधा अपेक्षित आहे.