नवी मुंबई एसइझेड
नवी मुंबई विशेष आर्थिक क्षेत्र
नियोजित नवी मुंबई स्पेशल इकॉनॉमिक झोन (एनएमएसईझेड) अर्थात न. मु. सेझ २१४० हेक्टर क्षेत्रावर पसरलेले असेल. त्यात द्रोणागिरी (१३९० हे), उलवे (400 हे) आणि कळंबोली (350 हे.) यांचा समावेश आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी सहभागातून राबवला जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे 25 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 5 लाखांपेक्षा अधिक प्रत्यक्ष रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.
सिडको आणि अन्य गुंतवणूकदार यांनी कंपनी कायदा १९५६ अंतर्गत नवी मुंबई विशेष आर्थिक क्षेत्र मर्यादित ही कंपनी स्थापन केली आहे. या क्षेत्राचा भूवापर बदलण्यात आला असून आता एकत्रित औद्द्योगिक क्षेत्र अशी त्याची ओळख निर्माण झाली झाली.
एक जवाहरलाल नेहरू पोर्ट आणि मुंबई बंदर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी आवश्यक दुवे प्रदान करतात. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ ६० ते ९० मिनिटांच्या अंतरावर आहे. याशिवाय, कोकण रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या दोन्ही भागांना प्रवेश मिळू शकतो. दक्षिण मुंबई ते न.मु सेझला जोडणारा जलमार्ग प्रस्तावित आहे. मुंबई पारबंदर प्रकल्प (एमटीएचएल) आणि प्रगतीपथावर असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे या क्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार आहे.