मुख्य तक्रार निवारण अधिकारी

नागरीकांशी सुसंवाद साधण्याच्या प्रयत्नातून सिडकोने ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली सुरु केली आहे. प्रशासन नागरिक-केन्द्री बनवून कामकाजात यामुळे पारदर्शकता आणि अधिक कार्यक्षमता हा यामागचा उद्देश आहे.  

प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि अधिक कार्यक्षमता आणणे तसेच प्रशासन नागरिक-केन्द्री बनविणे यासाठी सुरु करण्यात आलेली सिडकोने ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली नागरीकांशी सुसंवाद साधण्यात मोठे योगदान आहे.   

नागरिक ऑनलाइन तक्रार निवारण प्रणालीद्वारे तक्रारी नोंदवू शकतात व त्यांचे निवारण करून घेउ शकतात. या प्रणालीचे सर्वात महत्वाचे घटक पुढीलप्रमाणे आहेत:

१.    ऑनलाईन तक्रार नोंदणी

२.    तक्रारींचे निवारणासाठी आणि तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विभागानुसार तक्रार निवारण अधिकारी

३.    नागरी सनद आणि पूर्वनिर्धारित काळानुसार सेवा वितरण यंत्रणा

४.    प्रत्येक तक्रारीची वेळेत दाखल घेतली जावी यासाठी नियत कालावधीत प्रतिसाद देण्याबाबत निश्चित करणारी प्रक्रिया

५.    तक्रारींची सद्द्यस्थिती आणि त्यावरील कार्यवाही ऑनलाइन जाणून घेण्यासाठी यंत्रणा.

आपल्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद मिळावा तसेच त्यांचा वेळेत निपटारा व्हावा यासाठी ऑनलाइन माध्यम वापरण्याची विनंती सिडको तक्रार निवारण पथक सर्व नागरिकांना करीत आहे.

मुख्य तक्रारण निवारण अधिकारी यांना भेटण्याची वेळ: सोमवार आणि गुरुवार दुपारी २ ते ५ दरम्यान.  

CGRO Log-in

# #