परिवहन आणि दूरसंचार विभाग
नवी मुंबईच्या वाहतुक आणि परिवहन भौतिक सुविधा तसेच दूरसंवाद यंत्रणा यांचे नियोजन, आरेखन आणि अंमलबजावणी करणे हे परिवहन व दूरसंवाद नियोजन विभाग मुख्यत्वे कार्य आहे. नवी मुंबईची वाहतूक व्यवस्था मुंबई महानगर प्रदेशाच्या वाहतूक व्यवस्थाशी एकत्मिकारीत्या विकसित करण्यात आली आहे. नवी मुंबईच्या विकास आराखड्यात सर्व प्रकारच्या वाहतुकीची म्हणजे रस्ते, रेल्वे, जल वाहतूक आणि हवाई वाहतूक यांची नाविन्यपूर्णरित्या सांगड घालण्यात आली आहे.
सर्व नोड्स किफायतशीर व जलदरित्या उपनगरीय रेल्वे मार्गांनी एकमेकांशी जोडले गेले आहेत. शहर स्तरावरील उच्च क्षमतेचे महामार्ग नियंत्रित जोड मार्गासह विकसित केले गेले आहेत. ज्यामुळे शहरांतर्गत तसेच शहर-बाह्य रस्त्यावरली वाहतूक विनाव्यत्यय सुरु राहते. नियोजनबद्धतेने उभारलेले उड्डाणपूल, फिडर रोड यांमुळे प्रत्येक नोडची अंतर्गत वाहतूक प्रणाली अखंडित व गतिमान बनली आहे.
रहदारीचे सिग्नल, पदपथावरील चिन्हे, रहदारीचे चिन्हे, ट्रक वाहनतळ आणि रेल्वे स्थानक परिसरातील ‘पे आणि पार्क’ यंत्रणा या रहदारीच्या व्यवस्थापनाशी संबंधित बाबींची कार्यवाही करण्यातही परिवहन आणि दूरसंवाद विभागाचा सहभाग असतो.
शहरी भागातील वाहतूक सुविधांचे नियोजन आणि रेखांकन
- नवी मुंबई नोड्समधील वाहतुक आराखडा
- रेल्वे व्यवस्था
- जल वाहतूक
- नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ
- नागरी महामार्ग
- आगार व ट्रक वाहनतळ तसेच बस स्थानक पायाभूत सुविधा
- ऑटो रिक्षा व टॅक्सी वाहनतळ
- पेट्रोल पंप, वजनकाटा इ.
- पदपथ दिव्यांच्या खांबावरील जाहिराती
- वाहतुक व्यवस्थापन आणि सिग्नल यंत्रणा
क्षेत्रीय पातळीवर वाहतूक यंत्रणेचे नियोजन आणि रेखांकन
- क्षेत्रीय वाहतूक यंत्रणा
- रस्त्याचे जाळे आणि जोड रस्ते
- स्थानक सभोवतालचे क्षेत्र
- बस आगर
वाहतूक व्यवस्थेचे नियोजन आणि रेखांकन
- खोपटा शहर
- नैना
- ज. ने. बं प्रभावक्षेत्र
- पालघर वसई - विरार
- इतर नवीन शहरे
दूरसंवाद व्यवस्थेचे नियोजन, रेखांकन, अंमलबजावणी आणि कार्यान्वयन
- नवी मुंबई पोलीस दलाच्या सहकार्याने सिडको विभागात सीसीटीव्ही देखरेख यंत्रणा
- नवी मुंबईत ४ जी भ्रमणध्वनी यंत्रणेसाठी टॉवर उभारणे आणि त्याचा भूपातळीवर पाया घालणे यासाठी परवाना
- सिडकोची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग यंत्रणा
- आपत्कालीन यंत्रणेअंतर्गत सिडको भवन येथे तात्काळ मदत कार्यासाठी क्लाऊड आधारित यंत्रणा
- नवी मुंबईतील ‘पे अँड पार्क’ क्षेत्रांसाठी सीसीटीव्ही देखरेख यंत्रणा
वाहतूक संरचनेच अंमलबजावणी
- रस्त्यांमधील चौक
- रहदारीचे दिवे
- रहदारीची चिन्हे
- ट्रक वाहनतळ येथील ‘पे आणि पार्क’ व्यवस्थेचे कार्यान्वयन
- रेल्वे स्थानक परिसरातील ‘पे आणि पार्क’ व्यवस्थेचे कार्यान्वयन
अंतर्गत उपयोगिता सेवा
- शहरातील क्षेत्रीय तत्वावर विविध उपयोगिता सेवांचे नियोजन करणे
- एमएसईबी, जीएआयएल, एमजेपी, एचपीसीएल, आयओसीएल, ओएनजीसी ई. संस्थांकडून आलेल्या प्रस्तावांची तपासणी करणे.
- परवानगी विषय आणि पुनःनियुक्ती प्रभार विविध संस्थांकडून प्राप्त करणे.
समन्वय कार्य
सार्वजानिक कार्य विभाग, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, एमओएआय, रेल्वे, भारतीय विमानतळ प्राधिकरण, एमबीपीटी, एमटीएनएल, जेएनपीटी, एमएमआरडीए, एमएसआरसीए, ई. संस्थांबरोबर समन्वय राखणे.